श्री क्षेत्र गाणगापूर येथील विश्रांती कट्टा
श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी पवित्र स्पर्शाने मंगलमय केलेला हा कट्टा संगमाकडे जाताना (आतील रस्त्यावरून) एका शेताला लागून आहे. श्रीगुरू संगमाला जाऊन परतीच्या वेळी या स्थानी विश्रांती घेत असत म्हणून याला विश्रांती कट्टा असे म्हणतात.
गाणगग्रामीचा कुलवाडी | मार्गी उभा कर जोडी || आडवा पुढे पडे | घडो घडी | पीक हजारो खंडी | देसी शूद्राला | स्वामीया नरहरी दत्तात्रेया
गुरुचरित्रामधील ४८व्या अध्यायात गाणगापूरला महाराज सकाळी संगमावर जात आणि अनुष्ठान संपवून माध्यान्ह काळी परत येत. वाटेत असलेल्या शेतात एक शेतकरी नित्य नमस्कार करीत असे. श्रीगुरूंच्या कृपेने शेतातील पीक (धान्य) दहापटीने वाढले हेच ते स्थान आहे.