लोकसेवा न्यूज

बोरगावच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राम देशेट्टी तर सचिव दत्तात्रय फुलारी

बोरगावच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राम देशेट्टी तर सचिव दत्तात्रय फुलारी


प्रतिनिधी दि २९:

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे) येथील श्री हर हर महादेव समाज सेवा मंडळ संचलित श्री महादेव विद्या मंदिर संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी राम देशेट्टी तर सचिव दत्तात्रय फुलारी यांची कार्यकारिणी मंडळाच्या सहविचार सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशालेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.नूतन अध्यक्ष राम देशेट्टी यांच्या निवडीचे सूचक अशोक देशेट्टी तर अनुमोदक दत्तात्रय फुलारी हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक देशेट्टी,कोषाध्यक्ष इस्माईल पठाण यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली.तर मावळते अध्यक्ष विलास देशेट्टी व सचिव किरण घोळसगाव यांना नूतन कार्यकारीणीकडून निरोप देत सत्कार करण्यात आला.यावेळी माजी उपाध्यक्ष गणेश फुलारी,मोहन काजळे,मल्लिकार्जुन जिरगे हे विश्वस्त उपस्थित होते.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रभाकर बंदिछोडे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन पदाधिकारी व विश्र्वस्तांचे सत्कार करून पुढील वाटचालीस व कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

फोटोचा मजकूर : बोरगाव दे येथील श्री हर हर महादेव समाज सेवा मंडळ नूतन अध्यक्ष राम देशेट्टी तर सचिव दत्तात्रय फुलारी यांच्या नूतन निवडी वेळी उपस्थित विश्वस्त मंडळ.

Exit mobile version