लोकसेवा न्यूज

लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा

लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा

सोलापूर | प्रतिनिधी

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, योग, पर्यावरण संवर्धन आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी संस्थापक अध्यक्ष मा. विठ्ठलराव वाघमारे यांच्याकडे असून, संस्थेचे उपाध्यक्ष मा. बाबासाहेब वाघमारे, सचिव डॉ. रावसाहेब वाघमारे, खजिनदार सौ. छायाताई विठ्ठलराव वाघमारे तसेच कार्याध्यक्ष सौ. शितलताई बाबासाहेब वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही समाजहित, शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक विकास तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत राज्यभर सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित केले जात असून, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

संस्थेच्या उपक्रमांची, पदाधिकाऱ्यांची आणि विविध सामाजिक कार्यक्रमांची अधिकृत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार असून, पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धतीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांनी संस्थेच्या जनहिताच्या कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version