राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डोंगरे परिवाराचा जाहीर प्रवेश
बारामती : ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे तसेच त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथील सहयोग सोसायटी येथे पार पडला.
सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या डोंगरे परिवाराच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ताकद मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असून सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुणांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात जनहिताचे कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुनिल पाटील, बाबुराव कोकाटे, पैलवान नितीन निळे, दीपक पुजारी, सर्जेराव चवरे, सहदेव पुजारी, दीपक गवळी, सादिक तांबोळी, महावीर पुजारी, सागर थोरात, मुन्ना बचुटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.