भविष्यातील कार डिझाइन स्पर्धेत पुण्याच्या तन्वी वैद्यची उल्लेखनीय कामगिरी

भविष्यातील कार डिझाइन स्पर्धेत पुण्याच्या तन्वी वैद्यची उल्लेखनीय कामगिरी

पुणे : बीएमडब्ल्यू या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “भविष्यातील गाड्यांची रचना” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्केच स्पर्धेत पुण्यातील तन्वी सुशील वैद्य हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून भारतातील पहिल्या सात सर्वोत्तम स्केचेसमध्ये तन्वीच्या स्केचची निवड झाली आहे.

तन्वी सध्या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून ती पुण्यातील पोतदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिच्या सर्जनशीलतेची, कल्पकतेची आणि भविष्यवेधी विचारशक्तीची दखल घेत बीएमडब्ल्यू कंपनीने तिला चेन्नई येथे आमंत्रित केले होते. तेथे कंपनीतर्फे तिचा अधिकृत सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या बीएमडब्ल्यूसारख्या कंपनीकडून मिळालेला हा सन्मान पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे. अल्पवयात मिळवलेले हे यश तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

तन्वीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक आणि सर्जनशील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *