लोकसेवा न्यूज

महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे पुण्यात योगासन स्पर्धेचे आयोजन.

महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे पुण्यात योगासन स्पर्धेचे आयोजन.
पुणे प्रतिनिधी: योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघ अंतर्गत महायोग उत्सव 2024 पुणे येथे तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात येत आहे स्पर्धेसाठी नोंदणी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असेल. स्पर्धेचे अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
सन 2020 मध्ये भारत सरकारने योगासनाचा समावेश क्रीडा प्रकारात केला आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त खेळाडू व योग पटुनी या सुवर योजनेचा लाभ घेऊन सहभाग नोंदवा , असे आवाहन योग शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निल पवार . महायोग उत्सव राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक सदानंद वाली, व पुणे जिल्हाध्यक्ष चंद्र ज्योती दळवी यांनी केले आहे.
ही स्पर्धा फक्त पारंपारिक योग प्रकारात (ट्रॅडिशनल योग) घेतली जाणार आहे यात अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने होईल.
खेळाडूंनी अधिक माहितीसाठी राज्य योगासन क्रीडा समिती व स्पर्धा प्रमुख राहुल येवला सर यांच्याशी संपर्क साधावे

Exit mobile version