*अंजनगावात राज्यस्तरीय खुल्या योगासन स्पर्धेचे आयोजन
*राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी व्हा!
मानवसेवा विकास फाउंडेशनचा उपक्रम
अमरावती (जि. प्र.)
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मधील मानवसेवा विकास फाउंडेशन द्वारे राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी संत गुलाबबाबा आश्रम, टाकरखेडा मोरे येथे आयोजीत करण्यात आली आहे.
योगाच्या प्राचिन पद्धतीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने ही राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेकरीता ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. प्रत्यक्ष स्पर्धा स्थळी येऊन सहभागी व्हावें. याच दिवशी दुपारी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अर्ज करण्याकरीता आधार कार्ड, ३ फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, योगसाधक, महिला, पुरुष, विद्यार्थी, वयोवृध्द असे सर्व सहभागी होऊ शकतात. मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, जिल्हा परीषद शाळा, इंग्लीश स्कूलचे विद्यार्थी तसेच व्यायाम शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्पुटर सेंटर, क्रीडा अकेडमी, सर्वसाधारण जनता इत्यादी सर्व क्रीडा प्रेमी सहभागी होऊ शकतात.
महत्वाचे म्हणजे ८ वर्ष ते खुला वर्ग म्हणजेच १०० वर्षापर्यंत सर्व सहभागी होऊ शकतात. वयानुसार ६ गट तयार करण्यात आले आहेत. बंधनकारक २ आसन व ऐच्छिक ३ आसन असे एकूण ५ आसन प्रत्येकी २० सेकंद करणे आवश्यक आहे. प्रत्येक गटासाठी ५ मेडल व प्रमाणपत्र तसेच प्रथम ३ विजेता खेळाडूंना रोख पारितोषिक असणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या शाळेने जास्त विद्यार्थी सहभागी करून घेतले त्या शाळेला विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. वयोगटानुसार आसनांच्या यादी व अधिक माहितीसाठी ९२७३६६३०३२ या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर योगासन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ नंदकिशोर पाटील यांनी केले आहे.