अमरावतीचा विकास फक्त VBA करू शकेल – सुजात आंबेडकर
अमरावती
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम (URF) यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच योग्य पक्ष असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले, “शहराला मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी हक्काचे नगरसेवक निवडणे आवश्यक आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरमच्या उमेदवारांना मतदान करणे गरजेचे आहे.”
सभेत वंचित बहुजन आघाडीच्या चांदूर रेल्वे नगराध्यक्ष प्रियांका विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती प्रतिनिधी