अक्कलकोट व मैंदर्गीतील नूतन लोकप्रतिनिधींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
सोलापूर | प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील अक्कलकोट व मैंदर्गी नगरपरिषदेतून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री मा. श्री. जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार समारंभात जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अक्कलकोट व मैंदर्गी शहरांमध्ये जनहितकारी, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी यावेळी केला.
या कार्यक्रमास आमदार श्री. देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, श्री. प्रदीप पाटील, श्री. शिवशरण जोजन, श्री. प्रविण शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.