मंत्री संजय राठोड सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर : राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सोलापूर विमानतळावर आगमन झाले असता प्रशासकीय अधिकारी तसेच विमानतळाबाहेर समाज बांधव व शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

यावेळी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, मजरेवाडी मंडळ अधिकारी रत्नाकर कांबळे तसेच शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, युवराज राठोड, शिवसेना तालुका प्रमुख संदीप राठोड, शिवराज चव्हाण, श्रीमंत चव्हाण, रमेश चव्हाण, अंकुश राठोड, किशोर जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.