लोकसेवा न्यूज

“बोरगाव देशमुख येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – मल्लिकार्जुन पाटील यांनी केली पाहणी”

बोरगाव देशमुख येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – मल्लिकार्जुन पाटील यांची पाहणी

🖊️ अक्कलकोट प्रतिनिधी

बोरगाव देशमुख (ता. अक्कलकोट):
तालुक्यातील बोरगाव देशमुख व परिसरात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीची स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल वाहून गेला असून काही ठिकाणी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या पार्श्वभूमीवर अक्कलकोट काँग्रेस (आय) तालुका अध्यक्ष मा.श्री मल्लिकार्जुन पाटील यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून बाधित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की,

“शासन व प्रशासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देऊ.”

पाटील यांनी सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, मा.तहसीलदार, मा.गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभाग प्रमुखांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली.

या पाहणी दौऱ्यात बोरगावचे माजी सरपंच विलास आप्पा सुरवसे, माजी उपसरपंच मौलाली पठाण, अरुण जाधव, निशांत कवडे यांच्यासह बोरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version