श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा

श्री महादेव महादेव विद्या मंदिर प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा

दि:६.अक्कलकोट तालुक्यातील श्री महादेव महादेव विद्या मंदिर प्रशालेत ६७ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर बंदिछोडे तर प्रमुख पाहुणे संजीवकुमार हत्तरके हे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. या वेळी शाम देशेट्टी व प्रशालेतील विद्यार्थी मनोगतातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्या विषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक प्रभाकर बंदिछोडे ,पांडुरंग पवार,रशिद पठाण ,शाम देशेट्टी , संजीवकुमार हत्तरके , विजयकुमार चव्हाण , अमोल फुलारी , आनंद सुतके , गुरूनाथ धनशेट्टी , दत्तात्रय मोरे , दरेप्पा बिराजदार ,यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पवार तर आभार रशीद पठाण यांनी मानले.

फोटो ओळी : श्री महादेव महादेव विद्या मंदिर प्रशालेत महापरिनिर्वाण दिन साजरा करताना शिक्षक वृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *