लोकसेवा न्यूज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘भारत टॅक्सी सेवा’चा शुभारंभ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘भारत टॅक्सी सेवा’चा शुभारंभ

नवी मुंबई | प्रतिनिधी | दि. २३ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘भारत टॅक्सी सेवा’ (Bharat Taxi Service) चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासोबतच सार्वजनिक वाहतूक सेवेला नवे बळ देणारा हा उपक्रम राज्यातील सहकार क्षेत्रासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सहकाराच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह व दर्जेदार टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील आधुनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि विमानतळावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Exit mobile version