लातूरचा आत्मा सर्वधर्मसमभावाचा; विकासाची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन
लातूर | प्रतिनिधी
लातूर शहराचा आत्मा सर्वधर्मसमभावाचा असून, त्यामुळेच शहरात कायम शांतता आणि विकासाला गती मिळत आहे. लातूरमधील प्रत्येक समाजघटक सकारात्मक विचारसरणीने कार्य करत असल्यामुळे गेल्या ५० वर्षांपासून येथे सक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची निवड होत आली आहे, असे प्रतिपादन एका जाहीर सभेत करण्यात आले.
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी घालून दिलेली लोकसेवेची परंपरा आजही लातूरमध्ये जिवंत आहे. अलीकडच्या काळात मी स्वतः लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, असेही त्यांनी सांगितले.
हीच विकासाची आणि विश्वासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी येणाऱ्या लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. हे सर्व उमेदवार समाजाभिमुख, कर्तव्यतत्पर असून त्यांच्या माध्यमातून लातूर शहराचा सर्वांगीण विकास करून घेण्याची जबाबदारी व हमी मी घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.