लोकसेवा न्यूज

काशीबाई नवले कॉलेज, आर्किटेक डिपार्टमेंट. सिंहगड रोड पुणे येथे डॉ भाग्यश्री वैद्य यांनी कॉलेजमध्ये योगाचl वर्ग घेतला.

पुणे प्रतिनिधी: (लोकसेवा न्यूज) काशीबाई नवले कॉलेज, आर्किटेक डिपार्टमेंट. सिंहगड रोड पुणे येथे डॉ भाग्यश्री वैद्य यांनी कॉलेजमध्ये योगाचl वर्ग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळे योगाचे प्रकार शिकवले. योगा आणि जिम मध्ये फरक काय आहे याबद्दल उत्कृष्टपणे माहिती दिली. आपण रोज व्यायाम केल्याने आपण जेवत असलेले अन्न आपल्या शरीराला पोषक द्रव्य, पोषण घटक कसे मिळवून देतो याचे उत्तम उदाहरण सोबत माहिती दिली. आणि तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस किंवा जास्त अभ्यास करताना रिलॅक्स होण्यासाठी, मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी काही प्राणायाम शिकवले. योग दिवस हा फक्त एका दिवस साजरा न करतात तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करावा. योगा करणे हा आपल्या जीवन शैलीचा एक भाग बनवावा अशा पद्धतीचे उत्कृष्ट शब्दांमध्ये मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित कल्याण मॅडम,, केतकी मॅडम, सोनाली मॅडम आणि कॉलेजचा पूर्ण स्टाफ उपस्थित होतl.

Exit mobile version