लोकसेवा न्यूज

बोरगाव देशमुख येथे गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना – भीम प्रेमी प्रतिष्ठान सोलापूरतर्फे भेट

लोकसेवा न्यूज*

बोरगाव देशमुख येथे गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना – भीम प्रेमी प्रतिष्ठान सोलापूरतर्फे भेट

अक्कलकोट प्रतिनिधी – पत्रकार विठ्ठलराव वाघमारे

बोरगाव देशमुख (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर):
गौतम बुद्धांच्या शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाला साकार रूप देत भीम प्रेमी प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने बोरगाव देशमुख येथे भगवान बुद्धांची आकर्षक मूर्ती भेट देण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त गावात एकात्मता, सौहार्द आणि बंधुत्वाचा सुंदर संदेश दिला गेला.

मूर्ती प्रतिष्ठापनेच्या या सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बनसोडे, सुंदर रणझुंजारे, तेजस रणझुंजारे, धनप्पा बनसोडे, दत्ता गायकवाड, सुभाष नडगिरे, शरणाप्पा गायकवाड यांसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे बोरगाव देशमुख गावात बौद्ध विचारसरणीचा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश रुजवला गेला आहे. भीम प्रेमी प्रतिष्ठान च्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच माता-भगिनी वर्गातून कलवा कदम, ज्योती रणझुंजारे, सविता नडगिरे, सुकुमार बनसोडे, लक्ष्मी बनसोडे यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बालगोपाळांनी देखील आनंदाने या कार्यक्रमात सहभाग घेत “जय भीम – जय भारत” घोषणांनी परिसर दुमदुमवला.

Exit mobile version