नागरी सहकारी बॅंकांच्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन…
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील नागरी सहकारी बॅंकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांसाठी आयोजित अभ्यासवर्गाचे आज उद्धाटन केले.
नागरी बॅंकांचे सहकारातील महत्वाचे स्थान, अर्थव्यवस्था सक्षम करण्याकरता या बॅंकांची भूमिका आणि त्यांचे योगदान हे मुद्दे या अनुषंगाने अधोरेखित केले. सोबत त्यांच्या व्यवसाय वृद्धीच्या संधी आणि समस्या यावरही सकारात्मक चर्चा झाली.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृह व सहकारमंत्री मा.श्री. अमित शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्रात आपल्या देशात क्रांती होत आहे. व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आपला देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना सहकार क्षेत्राचे त्यामध्ये भरीव योगदान असेल, हे देखील या दरम्यान नमूद केले.
या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडगाव जी, श्री. रविंद्र हेजिब जी, श्री. मिलिंद देशपांडे जी, श्री. विनायक गोविलकर जी, श्रीमती अलकाताई पेटकर समवेत अनेक सहकारी बॅंकांचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.