लोकसेवा न्यूज

सोलापुरात अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम

सोलापुरात अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम

🖊️ लोकसेवा न्यूज प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, अनेक शेतकरी बांधवांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पशुधनाची झालेली हानीदेखील गंभीर स्वरूपाची आहे. गावोगावी ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळत आहे.

याबाबत लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, “या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांना धीर देणे हे माझे कर्तव्य आहे. पिकांचे, घरांचे व व्यवसायांचे झालेले नुकसान आभाळाएवढे आहे. मात्र शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी मी त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे.”

महायुती सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शासन व प्रशासन तातडीने मदत पोहोचवण्यासाठी कामाला लागले असून, शेतकरी बांधव या संकटाच्या काळात एकटे नाहीत, असा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version