अकलूजमध्ये नेतृत्व विकासासाठी भव्य कार्यशाळा – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन
🖊️ सोलापूर प्रतिनिधी
अकलूज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्र (PM USHA योजनेअंतर्गत) नेतृत्व विकास कौशल्य या विषयावर भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नेतृत्व गुणांच्या विकासाबाबत उपस्थितांशी संवाद साधला.
या प्रसंगी डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. केदारनाथ काळवणे, श्री. महेश गोरे व श्री. निरज घोनशीकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील, कु. इशिता मोहिते पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.