- सिंधुदुर्ग | लोकसेवा न्यूज
नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य शुभारंभ; मुख्यमंत्र्यांकडून गौरव
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री व खासदार Narayan Rane यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडला. या वेळी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राणे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना आपल्या राजकीय वाटचालीतील मार्गदर्शक मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभेतील आपल्या कारकिर्दीची सुरुवात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. पहिल्याच भाषणानंतर त्यांनी पाठवलेली ‘छान बोललास’ ही चिठ्ठी आजही प्रेरणादायी आहे. तसेच आपल्या संसदीय यशामागेही राणे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री Nitin Gadkari, पालकमंत्री Nitesh Rane, मंत्री Radhakrishna Vikhe Patil, Ashish Shelar, Uday Samant, खासदार Sunil Tatkare तसेच आमदार Deepak Kesarkar, Ravindra Chavan, Pravin Darekar, Nilesh Rane यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राणे यांच्या विधानसभेतील भाषणांचे कौतुक करत सांगितले की, नव्या सदस्यांनी त्यांच्या भाषणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
दरम्यान, या सोहळ्यात राणे यांच्या जीवनावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
— लोकसेवा न्यूज