लोकसेवा न्यूज

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे भीषण अपघात; चार ठार तर ९ ते १० जण जखमी

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे भीषण अपघात; चार ठार तर ९ ते १० जण जखमी

अक्कलकोट दि.1 सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चारचाकीचा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन

गाणगापूरला जात असताना मैंदर्गीजवळ भीषण अपघात घडला आहे. समोरासमोर झालेल्या अपघातात २ महिला आणि २ पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर ९ ते १० जण गंभीर जखमी झाले असुन, सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

Exit mobile version