लोकसेवा न्यूज

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती कृषी तज्ञ आप्पासाहेब पाटील यांची निवड

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी कृषीतज्ञ अप्पासाहेब पाटील यांची निवड

अक्कलकोट : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर उपसभापती पदी कृषीतज्ञ अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच कार्येकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालचे उधळण करीत फटकाचे आतषबाजी केली.
दरम्यान सभापती पदाकरिता सिद्रामप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज आला होता. तर उपसभापती पदाकरिता सत्ताधारी गटाचे अप्पासाहेब पाटील व बसवराज माशाळे तर विरोधी गटाचे कार्तिक पाटील या तिघांचे अर्ज आले. यामध्ये सत्ताधारी गटाचे बसवराज माशाळे हे व्यापारी मतदारसंघातून असल्याने या गटाला उपसभापती पदाकरिता निवडणूक लढविता येत नसल्याने सदरचा अर्ज अवैध ठरले. कार्तिक पाटील व अप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये मतदान होवून यामध्ये अप्पासाहेब पाटील यांना 12 तर कार्तिक पाटील यांना 6 मते मिळाली. यामध्ये अप्पासाहेब पाटील यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.जी.झालटे यांनी जाहीर केले.

Exit mobile version