लोकसेवा न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तूपचे लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुपचे लोकार्पण…

📍 मुळेगाव, ता. द. सोलापूर

सोलापूर प्रतिनिधी :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थि चैतन्य स्तुप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे साकारला असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले
. ६ डिसेंबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र अस्ति मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथून अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे आणण्यात आल्या आणि त्यानंतर या अस्थिंना मुळेगाव येथे आणण्यात आले. आज याच अस्थि चैतन्य स्तुप स्वरूपात उत्तमरित्या जतन केल्या आहेत.

यावेळी पूज्य राजरत्न भन्तेजी, सरपंच सविता भोसले, श्री. बाळासाहेब वाघमारे, श्री. गौतम कसबे, श्री. नारायण बनसोडे, श्री. नीलकंठ पाटील, श्री. चंद्रशेखर मडीखांबे, श्री. आप्पासाहेब पाटील, श्री. नेताजी खंडागळे, श्री. शिवराज जाधव, श्री. रमेश केत, श्री. यशवंत इंगळे, श्री. नळपती बनसोडे, श्री. निवृत्ती ताकमोगे, श्री. नामदेव शिंदे, श्री. बालाजी इंगळे, श्री. संजय बनसोडे, श्री. बालाजी बनसोडे, श्री. चंद्रशेखर शिंगे, श्री. दिगंबर जाधव, श्री. मिलिंद खरात आदींसह नागरीक, माता -भगिनी, ग्रामपंचायत सदस्य आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version