लोकसेवा न्यूज

अंगणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बोरगाव देशमुख (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर)

अंगणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बोरगाव देशमुख येथील अंगणवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी भीमगीत, भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम व गावडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version