लोकसेवा न्यूज

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भीम प्रेमी प्रतिष्ठान सोलापूरतर्फे बुद्धमूर्तींचे वाटप

भीम प्रेमी प्रतिष्ठान सोलापूरतर्फे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बुद्धमूर्तींचे वाटप

अक्कलकोट प्रतिनिधी : पत्रकार विठ्ठलराव वाघमारे, लोकसेवा न्यूज

बोरगाव दे (ता. अक्कलकोट)
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भीम प्रेमी प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने विविध मंडळांना बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक विजू दा नागमोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या प्रसंगी राजेंद्र गायकवाड (सर), दत्ता मारुती गायकवाड (अध्यक्ष), दत्ता शि. गायकवाड (जयंती समिती अध्यक्ष), इंजिनीअर राजेश मिस्त्री, तसेच तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य, निळा ध्वज फडकवणारे आमचे लाडके मेंबर खाजाप्पा मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बनसोडे, राजेश वाघमारे, धानाप्पा बनसोडे, सुभाष नडगिरे, सुंदर रणझुंजारे, आणि दलित समाजाचे धुरंधर नेते व समाजसेवक तेजस रणझुंजारे उपस्थित होते.

कार्यक्रमात बोरगाव दे व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश जिवंत ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Exit mobile version