लोकसेवा न्यूज
वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचा बोरगाव देशमुख येथे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम
बोरगाव देशमुख | प्रतिनिधी
समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, बोरगाव देशमुख येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप करून आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ओढ निर्माण व्हावी आणि समाजात सेवाभावाची जाणीव दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
यावेळी प्रगतिशील शेतकरी सुधाकर पाटील, माजी सरपंच विलास आप्पा सुरवसे, माजी सरपंच तथा तंटामुक्त अध्यक्ष चन्नाप्पा (मामा) कामशेट्टी, कविता मठदेवरु मॅडम, पोलीस पाटील अभिजीत पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष गुंडाप्पा गावडे, माजी डेप्युटी सरपंच अब्दुल बागवान, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे, कृष्णा रणझुंजारे, रोहिदास गायकवाड, सोमा बनसोडे, राम नडकिरे, पत्रकार बाबासाहेब वाघमारे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिक्षण, आरोग्य, समाजसेवा आणि जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशाच लोकहितवादी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ∎
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचे, चांगले संस्कार जोपासण्याचे आणि भविष्यात जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील प्रत्येकाने वाढदिवसासारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजहिताच्या उपक्रमांद्वारे साजरे करावेत, असे मत व्यक्त करण्यात आले.