सहकार प्रदर्शनी, सहकार गीत आणि ध्वजाचे अनावरण केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या अनुषंगाने सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीतील महत्व, सहकारी संस्थांची भूमिका आणि जबाबदारी हे विषय प्रामुख्याने अधोरेखित केले.
मुंबई दि ६पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि गृह व सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्रात संपूर्ण देशात अभूतपूर्व कार्य सुरू आहे. पॅक्सचे सक्षमीकरण, धान्य गोदामांची निर्मिती, राष्ट्रीय स्तरावर NCOL, NCEL व BBSSL सारख्या नवीन सहकारी संस्थांची निर्मिती यांसारखे अनेक उपक्रम केंद्रीय सहकार मंत्रालयाने देशपातळीवर सुरु केले आहेत.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकारमंत्री श्री. बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री श्री. पंकज भोयर, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक श्री. विद्याधर अनासकर, आमदार श्री. प्रविणजी दरेकर, श्री. शिवाजीराव कार्डिले, श्री. आनंदराव अडसूळ, डॉ. उदयजी जोशी यांच्यासह मान्यवर आणि सहकारी बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित
होते.