चंद्रयान यशस्वी उतरल्यानंतर मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मध्ये उत्सव साजरा
अंजनगांव सुर्जी – ता. प्र.
येथील महेश नगर मधील मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मध्ये चंद्रयान यशस्वी चंद्रावर उतरल्यानंतर २३ ऑगस्ट २०२३ रोजी उत्सव साजरा करण्यात आला. चंद्रयान तीन हे दक्षिण ध्रुवावर उतरणारे जगातील पहिले यान ठरल्याने संपुर्ण भारतीय शास्त्रज्ञ व जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्वांचे गोडतोंड करण्याकरिता पेढे वाटप करण्यात आले. तसेच मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मानवसेवा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर पाटील व किरण गिऱ्हे यांनी उत्कृष्ट भाषण देऊन आपले मत मांडले.
यावेळी कॉलेजचे कर्मचारी डॉ अक्षय चौधरी, डॉ मोहन नेसनेसकर, डॉ प्रिया पाटील, अंन्वी चौधरी, मनीषा कोथे, दर्शना इताल, वैशाली मावळे, साक्षी पाटील, माया रोडे, प्रियंका हाडोळे, अक्षय धुळे, मिनल थोटांगरे व विद्यार्थी मध्ये रेणुका बोरोडे, प्रिया पांडे, केयुर पटेल वसुंधरा शिवारकर, निधी धांडे, श्रृती आटोले, सुहानी माकोडे, समृद्धी नाठे, कोमल सावरकर उपस्थित होते.