लोकसेवा न्यूज

भीमनगरचा पाणीप्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून सरपंच व ग्रामसेवकांचे अभिनंदन

भीमनगरातील पाणीप्रश्न मार्गी; ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन

लोकसेवा न्यूज
प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे

बोरगाव देशमुख :
बोरगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तत्परता दाखवत संबंधित बोअरवर मोटार बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला.

गावातील मूलभूत सुविधांबाबत अशाच प्रकारे त्वरित कार्यवाही होत राहावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यामुळे भीमनगर परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने काम पूर्ण केल्याबद्दल भीमनगर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version