बोरगाव देशमुख येथे भीम ज्योत तरुण मंडळाकडून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक संपन्न

बोरगाव देशमुख येथे भीम ज्योत तरुण मंडळाकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक संपन्न
अक्कलकोट (प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरगाव येथे मोठ्या उत्साहात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाची सांगता दिनांक 28 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीनी करण्यात आले. या मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी माझी सरपंच मकबूल मुजावर विद्यमान उपसरपंच अब्दुल पठाण ( पोलीस पाटील) अभिजीत पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. भीम नगर येथून मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला .
सदरची मिरवणूक गावातील विविध चौकातून काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भीमसैनिक, महिला वर्ग सहभागी झाले होते.
डॉल्बीच्या गाण्यावर तरुणाईने नाचून जल्लोष केला. या मिरवणुकी दरम्यान गावातील विविध राजकीय ,सामाजिक, क्षेत्रातील व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत (सदस्य) बाळकृष्ण बनसोडे, माझी ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम, प्रा राजेंद्र गायकवाड , राजेश वाघमारे, रवी बनसोडे, दत्ता गायकवाड, राजेश मिस्त्री, बाळू गायकवाड, कृष्णा रणझुंजारे, तेजस रणझुंजारे, राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळू वाघमारे, तुळशीराम रणझुंजारे, विठ्ठलराव वाघमारे (लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) आदी सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *