लोकसेवा न्यूज

उदगीरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अनावरण

उदगीरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अनावरण

उदगीर (जि. लातूर) : राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील आणि राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, माजी मंत्री व आमदार श्री. संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे अनावरण करण्यात आले.

या भव्य सोहळ्यादरम्यान विश्वशांती बुद्धविहार परिसरातील शिल्पाकृती, गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलँड आणि पार्क या विकासकामांचे भूमिपूजनही पार पडले.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे देशाला दिशा दाखवणारे आहे. हे स्मारक म्हणजे देशाचा स्वाभिमान, संघर्षाचे प्रतीक आणि समतेच्या विचारांचे जिवंत प्रेरणास्थळ ठरेल.”

या प्रसंगी राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक, माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार गोविंदराव (अण्णा) केंद्रे, भदंत उपगुप्त महाथेरो, भंते पय्यानंद थेरो, भंते नागसेन बोधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version