लोकसेवा न्यूज

अरविंद येवले यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड; डॉ. धनंजय जगताप सचिवपदी नियुक्त

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पुणे प्रतिनिधी : पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.

यामध्ये अरविंद येवले यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, डॉ. धनंजय जगताप यांची पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमित कुंभार यांची पुणे जिल्हा सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवडीप्रसंगी डॉ. म्हात्रे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पत्रकारिता क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी तसेच समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version