अक्कलकोटच्या हत्ती तलावाच्या सौंदर्यात भर; ५ कोटींच्या कारंजा प्रकल्पास मंजुरी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने अतिरिक्त ५ कोटी निधी मंजूर
अक्कलकोट प्रतिनिधी.येथील ऐतिहासिक संस्थानकालीन हत्ती तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी महायुती सरकारकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संगीतमय आणि विद्युत रोषणाईयुक्त कारंजे उभारले जाणार असून, संपूर्ण तलावाचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण १० कोटी रुपये खर्चून होणार आहे.
विशेष म्हणजे, या कारंजासाठी शुद्ध पाणी वापरण्यात येणार असल्याने ते कायमस्वरूपी सुरळीत सुरू राहील. हा प्रकल्प अक्कलकोटवासीयांसाठी आणि स्वामीभक्तांसाठी एक नवा अनुभव देईल तसेच अक्कलकोटच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.