लोकसेवा न्यूज

पर्यटकांचा अतिउत्साह नडला; आंजर्ले बीचवर एसयूव्ही कार समुद्रात बुडाली

पर्यटकांचा अतिउत्साह नडला; आंजर्ले बीचवर एसयूव्ही कार समुद्रात बुडाली

आंजर्ले (प्रतिनिधी):
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे एक एसयूव्ही कार समुद्राच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली. समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालविताना चालकाने कार समुद्राच्या दिशेने नेली. मात्र, भरतीचे पाणी अचानक वाढल्याने वाहन समुद्रात अडकले आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

– लोकसेवा न्यूज

समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालविणे धोकादायक असल्याने पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची व पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

Exit mobile version