मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ACUCON 2026’ स्मरणिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ACUCON 2026’ स्मरणिकेचे प्रकाशन

नागपूर, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे आयोजित ‘ACUCON 2026’ च्या उद्घाटन समारंभात ‘फर्स्ट नॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲक्युपंक्चर’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले.

या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या संशोधन, शिक्षण आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेतील योगदानावर विविध तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

परिषदेत ॲक्युपंक्चर क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि राष्ट्रीय स्तरावरील समन्वय यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाला महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे प्रशासक डॉ. रूमी बेरामजी, नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ ॲक्युपंक्चर, दिल्लीचे अध्यक्ष डॉ. रमन कपूर, आयुष्यमान ॲक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, नागपूरचे अध्यक्ष डॉ. त्रिदीप गुहा यांच्यासह देशभरातील ॲक्युपंक्चर क्षेत्रातील तज्ज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *