अभ्यंग स्नानाचे महत्त्व-डॉ. भाग्यश्री वैद्य

अभ्यंग स्नानाचे महत्त्व—- डॉ. भाग्यश्री वैद्य
दिवाळी म्हटलं की सगळ्यांनाच सर्वप्रथम आठवते ते म्हणजे दिवाळीचा फराळ व अभ्यंग स्नान. आपला हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी यमराज व भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते आणि सुख, समृद्धी व समाधान याची कामना केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. या स्नानाला बरेच जण पहिली अंघोळ देखील म्हणतात. आजच्या लेखांमध्ये आपण जाऊन जाणून घेऊयात की अभ्यंग स्नानाचे महत्त्व व त्यांचे फायदे काय आहे आहेत?
अभ्यंगम आचारेत नित्यम असं आयुर्वेदातिल दिनचर्येमधले एक सूत्र आहे. अभ्यंग स्नान हे नित्य करायला हवे पण नेमकं अभ्यंग असणार म्हणजे काय? हे कसे करावे? व कधी करावे?
रोग झाल्यावर आपल्या शरीराची काळजी घेण्यापेक्षा आपल्याला रोग होऊ नये म्हणून आपण आधीपासूनच काळजी घ्यायला हवी हे आपल्याला सांगण्याचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. आणि या आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. आज-काल मसाज ला ही खूप महत्त्व आहे पण अभ्यंग स्नानामध्ये त्वचेला हलक्या हाताने चोळणे व ते तेल त्वचेमध्ये मुरवणे म्हणजे अभ्यंग होय. बरेच जण अभ्यंग स्नानाच्या दिवशी बाहेरून मसाज करून येतात व घरी येऊन गरम पाण्याने स्नान करतात. मात्र जोर लावून मसाज करणे म्हणजे याला आयुर्वेदामध्ये मर्दन म्हणतात.
अभ्यंग स्नान हे प्रामुख्याने पहाटे चार ते सातच्या दरम्यान केले जाते. कारण, या कालावधीमध्ये वातावरणामध्ये व शरीरामध्येही वाताचे प्रमाण जास्त झालेले असते, यावेळी अभंग केल्याने आपल्याला शरीरातील वात कमी करण्यासाठी जास्त फायदा होत असतो. थंडीच्या दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी व रुक्ष पडते तेव्हा यावेळी त्वचेला योग्य तेलाचा वापर करून त्वचेमध्ये स्निग्धदा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.
आपल्या प्रकृतीनुसार योग्यते निवडून ते थोडं कोमट करून हलक्या हाताने मसाज करून त्वचेमध्ये ते जिरवावे. यात हात व पायाचे तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, पाठ, मान, चेहऱ्या वर इत्यादी सर्वांगाला खालून वर या पद्धतीने तेल मुरबावे. यामुळे त्वचेखाली असलेल्या स्वेद नलिका मोकळ्या होतात व शरीरातील क्लेद म्हणजे मळ बाहेर यायला मदत होते. ही क्रिया झाल्यावर लगेच स्नान न करता साधारण वीस मिनिटे तरी ते त्वचेमध्ये मुरू द्यावे व मग स्नान करावे.
आता आपण उद्धवर्तन म्हणजे उटणे याबद्दल पाहूयात. उद्धवर्तन म्हणजे सुगंधी चूर्णनानि शरीराला घर्षण करणे. तेव्हा आपण यामध्ये त्रिफळा, सारीवा, नागरमोथा, अश्वगंधा, चंदन, मसूरचे पीठ इत्यादी अशा विविध द्रव्यांचा वापर करू शकतो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेला घर्षण म्हणजे उद्धवर्धन करून त्वचेवरचा मळ कमी करायला मदत होते.
नियमित अभ्यंग केल्याने त्वचेचा कोरडेपणा नष्ट होतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ लागतात. त्वचा तेजस्वी व तरुण दिसते. रक्तप्रवाह सुरळीत होतो वातदोष कमी होऊन भविष्यात वातामुळे होणारे विकार टाळता येतात. शरीर व मन प्रसन्न राहते त्यामुळे निद्रानाश कमी होतो व शांत झोप लागते.
त्यामुळे या अभ्यंग उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित या दिनचर्येच्या पद्धतीला दिनचर्येचा एक भाग बनवला तर नक्कीच आपण आपले आरोग्य निरोगी व प्रसन्न ठेवण्यास मदत करू शकतो.

डॉ. भाग्यश्री केंडे- वैद्य
डिझाईन योगा अकॅडमी. पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *